Tuesday, 23 January 2018

स्वच्छतेची प्रतिज्ञा

स्वच्छतेची प्रतिज्ञा

 आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत  स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शाळेत शिक्षण घेणाऱ्या  इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गात शिक्षण घेणाऱ्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी परिपाठाच्या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.  ती अशी . . . . . . . . .
मी शपथ घेतो की,  मी स्वतः  स्वच्छत्तेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल.  दरवर्षी शंभर
तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करीन. मी स्वतः
घाण करणार नाही आणि दुस-यालाही करू देणार नाही.  सर्वप्रथम मी स्वतःपासून,  माझ्या कुटुंबापासुन,  गल्ली
वस्तीपासून,  माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्य स्थळापासून या कामास सुरुवात करेल.  मला हे मान्य आहे
की जगामधील शहरे स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण
करू देत नाही.  या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज
जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल.  तेही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी शंभर
तास देतील यासाठी मी प्रयत्न करेल. मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण
देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. 



स्वच्छता अॅप चे कार्य

स्वच्छता अॅप चे कार्य 

आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण होण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी स्वच्छता ऍपचा वापर कसा करावा, अॅपमधील आपली तक्रार गॅलरी किंवा प्रत्यक्षस्थळी फोटो काढून कशी अपलोड करावी, त्या तक्रारीसाठी दिलेल्या सूचनांमधील योग्य सूचना कशी निवडावी व तक्रार अपलोड कशी करावी, पोस्ट केलेली तक्रार सोडवली गेली की अपूर्ण आहे अथवा काम चालू आहे हे कसे पाहावे,  तक्रार दूर झाली तर त्याला फिडबॅक कसा द्यावा, आपल्या परिसरात किंवा शहरात राहणाऱ्या नागरिकांनी टाकलेल्या तक्रारींना अभिप्राय कसा द्यावा या संदर्भात शाळेतील शिक्षक श्री. जगदीश धनगर,  श्री. महेंद्र माळी,  श्री.  गजेंद्र जाधव,  श्री.  गोपाळ न्हावी व श्री. संदीप चौधरी यांनी व्हिडिओ तयार केला व प्रभाग क्रमांक एकमधील चौका-चौकात प्रोजेक्टचा वापर करून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.  हा तयार केलेला व्हिडिओ परिसरातील तरुणांच्या व नागरिकांच्या मोबाइलमध्ये शेअर करण्यात आला. ऍपचा वापर करून परिसरात असलेल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य

स्वच्छतेची ज्योत पथनाट्य - आर.  सी.  पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण होण्यासाठी शाळेतील चिमुकल्यांचे पथनाट्य तयार करून प्रभाग क्रमांक - १ मध्ये चौका चौकात पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले.  शिरपूर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने सर्व नागरीक कशा प्रकारे सहकार्य करू शकतात हे पथनाट्यातून सादर करण्यात आले. ओला कचरा व सुका कचरा यांचे विलगीकरण करणे, घरातील ओल्या कचऱ्याचे विघटन करून घरच्या घरी खत तयार करता येऊ शकते इत्यादीबाबत पथनाट्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून शिरपूर शहरात प्रभावीपणे जनजागृती केली. पथनाट्यासोबत 'स्वच्छतेकी  लहर चली' या नृत्यातूनही  नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या पथनाटय़ामध्ये इयत्ता चौथीमधील बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



स्वच्छता सर्वेक्षण 2018

स्वच्छता सर्वेक्षण जनजागरुकता

स्वच्छता जनजागरुकता - आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत शिरपूर शहरातील नगरवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रभाग क्रमांक - १  या परिसरात शाळेतील शिक्षकांनी घरोघरी भेटी दिल्या. परिसर स्वच्छ राखण्यासाठी घरातील कचरा कचरापेटीत टाकावा. घरात व परिसरात निर्माण होणाऱ्या  कचऱ्याचे विलगीकरण 'ओला कचरा व सुका कचरा' असे करून नगरपालिकेने दिलेल्या डस्टबीन मध्ये ओला कचरा टाकावा व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डस्टबीन करावी व त्यांचा वापर करावा. यामुळे नगरपालिकेत कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. आपल्या घराचा परिसर 
'वापरा आणि फेका ऐवजी वापरा आणि पुन्हा वापरा' 
अशी आपण सर्वांनी सवय लावून घेतली तर परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर कमी करून त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा इत्यादीबाबत नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांच्या अडी अडचणींची नोंद घेऊन त्या सोडविण्याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधण्यात आला.


संगणक लॅब

संगणक लॅब 

 आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत प्राथमिक विभागासाठी संस्थेकडून भव्य अशी संगणक लॅब तयार करून देण्यात आली. अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध असलेल्या लॅबचे १८   डिसेंबर २०१८ रोजी मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.  संस्थेने शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांना संगणकाच्या सहाय्याने  परिणामकारक अध्यापन करण्यासाठी लॅब उपलब्ध करून दिली. या संगणक लॅब मध्ये  पस्तीस अद्ययावत कॉम्प्युटर, एल. सी. डी. प्रोजेक्टर व जलद असे इंटरनेट सुविधा अशी लॅब उभारली गेलेली आहे. 

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेतील शिक्षक श्री. महेंद्र माळी व एच. आर.  पटेल मराठी कन्या प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेतील शिक्षक श्री. संजय पटेल यांनी स्वखर्चाने तयार केलेल्या डिजिटल वर्गाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 
  

Monday, 22 January 2018

मम्मीजी क्रीडा महोत्सव

मम्मीजी क्रीडा महोत्सव

                                                   आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात प्राथमिक विभागासाठी दरवर्षी मा. मम्मीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मम्मीजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.  आर. सी. पटेल प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेच्या भव्य मैदानावर १८ डिसेंबर वार सोमवार रोजी या महोत्सवाचे आयोजन केले गेले. इयत्ता पहिली व दुसरी या गटासाठी लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत , गोणपाट शर्यत , बादलीत चेंडू टाकणे अशा प्रकारच्या विवधि स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथी या गटासाठी शंभर मीटर धावणे , पन्नास मीटर लंग्‍डी , खो-खो,  कॅरम,  बुद्धिबळ , दोरीउड्या अश्या विविध स्पर्धा होत्या. आर. सी. पटेल पटेल संकुलातील सर्व प्राथमिक विभाग यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन केले गेले. प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र अशी जागा आखलेली होती. या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने बॅडमिंटन , लिंबू चमचा , शंभर मीटर धावणे , कॅरम , बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवली. या मम्मीची क्रीडा महोत्सवात आर. सी.  पटेल संकुलातील सुमारे सोळाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली. 


Thursday, 7 December 2017

स्वच्छता रॅली

"स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन."

         
           शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम प्रसंगी आरोग्य सभापती सलीम खाटीक, कोऑरडीनेटर तेजस्विनी मानकर,महेंद्र परदेशी, गणेश साळुंखे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, जगदीश सोलंकी, रमेश शिरसाठ, सुभाष भिल आदी उपस्थित होते. मिशन स्वच्छ विद्यालय बाबत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी  मार्गदर्शन केले. समाजात स्वच्छता बाबत जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.रॅलीतून स्वच्छ शहर,सुंदर शहर अशी वाक्ये वदवून गल्लीतुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती करिता शालेय स्तरावर दोन गटातून चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता १ ली व २ री ,३ री व ४ थी या  गटातून अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.दोन गटात घेतलेल्या स्पर्धेत कचरा ,कचरा पेटीत टाकणारा मुलगा,साफसफाई करणारा मुलगा अशी चित्रे विद्यार्थ्यांना रंगविण्यासाठी देण्यात आली.सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. आभार संदीप चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र माळी, अविनाश राजपूत,गोपाल न्हावी, जगदीश धनगर , भिल,यांनी परिश्रम घेतले.


 

Monday, 4 December 2017

संविधान दिवस

"संविधान दिवस"

                    शिरपूर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत संविधान दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. या औपचारिक कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ. आर. डी. माळी, श्रीमती एम. आर. सोनवणे, सौ. स्मिता साळुंखे, सौ.  वंदना सोनवणे, श्री. जगदीश सोलंकी, श्री. रमेश शिरसाठ, श्री.  प्रकाश ईशी आदी उपस्थित होते.  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे संविधान सुपुर्द केले.  तो दिवस भारतभर सर्वत्र संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.  मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील यांनी संविधानातील  मार्गदर्शक तत्वे समजावून सांगितले. यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आदी महत्वपूर्ण गोष्टीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाचे महत्त्व श्री. अविनाश राजपूत यांनी विषद केले.  स्वातंत्र्यानंतर भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र होणार,प्रजा हितासाठी संविधान ही एक उत्तम नियमावली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांची संविधानिक जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून इयत्ता दुसरीतील अनार्य भुषण बछाव या विद्यार्थ्याने गोष्टीचे पुस्तक शाळेला भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांकडून संविधानतेची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार श्री. गजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.  महेंद्र माळी, श्री.  गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर , श्री. योगेश बागुल , श्री. अनिल माळी, श्री. संदीप चौधरी , श्री. सुभाष भिल यांनी परिश्रम घेतले.


Thursday, 16 November 2017

शालेय परिवहन समिती मासिक सहविचार सभा

" शालेय परिवहन समिती मासिक सहविचार सभा"

        
           शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत शालेय परिवहन मासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम प्रसंगी रिक्षा वाहतूक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. दत्तू माळी , शहराध्यक्ष श्री. नितीन पाटील,  माजी नगरसेवक श्री. दिलीप बोरसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी वाहतूक करतांना रिक्षा चालक व मालकांनी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करत असताना रिक्षेत मर्यादीत विद्यार्थी संख्या असावी. पालक व शाळा यांचा दुवा म्हणजे रिक्षा चालक आहेत.
रिक्षेवर विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे लोगो, नाव ठळक अक्षरात लिहावे जेणेकरून अवजड वाहनधारक छोट्या वाहनांसाठी प्रथम जाण्यासाठी प्राधान्य देतील.  रिक्षेत विदयार्थी यादी तसेच पालकांचे मोबाईल नंबर असलेली यादी असावी, प्रथमोपचार साहित्य रिक्षेत असणे बाबतचे मनोगत श्री. अविनाश राजपूत यांनी व्यक्त केले. सहविचार सभेचे सूत्रसंचालन व आभार श्री. महेंद्र माळी यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी श्री. रमेश शिरसाठ, श्री. संदीप पाटील, श्रीमती यशोदा पाटील, श्री. सतिष पाटील, श्री. सागर पवार यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, 15 November 2017

विद्यार्थी दिवस


"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस."

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरी करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी  मुख्याध्यापक  श्री. सी. डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी.बी.काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते.  दि.७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील शाळेत प्रथम प्रवेश निमित्ताने विद्यार्थी दिवस साजरी करण्यात आला. प्रथम प्रवेश दिनानिमित्त विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र माळी यांनी केले. श्री. जगदीश सोलंकी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी, श्री. अनिल माळी, श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.




Monday, 13 November 2017

राष्टीय एकता दिवस


" बॅ. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस."

                    शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सी.डी. पाटील, सौ. आर.डी. माळी, सौ. एम.आर.सोनवणे, श्रीमती बी. बी. काटोले, श्री. रमेश शिरसाठ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शाळेत विवध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकसंघतेसाठी केलेले कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोलंकी यांनी केले. तर आभार श्री. प्रकाश ईशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र माळी, श्री. अविनाश राजपूत, श्री. गजेंद्र जाधव, श्री. सुभाष भिल, श्री. संदीप चौधरी, श्री. अनिल माळी,  श्री. गोपाल न्हावी, श्री. जगदीश धनगर, श्री. योगेश बागुल यांनी परिश्रम घेतले.

"राष्ट्रीय एकता दिवस"