Sunday, 22 July 2018

योगासन प्रात्यक्षिक

योगासन प्रात्यक्षिकअार. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक ०६/०७/२०१७ वार शुक्रवार रोजी शाळेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याचे योगासन प्रात्यक्षिक घेण्यात आले. योगासन वर्गाची सुरुवात मंत्रपठणाने करण्यात आली. विविध प्रकारच्या योगासनांचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. ताडासन,  वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तानमंडूकासन, वक्रासन, मकरासन, भुजंगासन, शलभासन, सेतूबांधासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, नाडीशोधन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायम व ध्यान या विविध आसनांचे प्रात्यक्षिक व सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. जगदीश सोलंकी सर यांनी पार पाडले. योगासन वर्गामध्ये इयत्ता चौथीमधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगासन वर्गाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.

गणित संबोध कार्यशाळा

गणित संबोध कार्यशाळा

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक १८/०७/२०१८ वार बुधवार रोजी इयत्ता चौथी वर्गासाठी ‘गणित संबोध कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी अमळनेर येथील प्राध्यापक श्री संजय न्हायदे यांनी गणित विषयातील विविध रंजक बाबी विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितल्या. गणित या विषयाला आपला मित्र बनवा, गणित या विषयातील युक्त्या वापरल्या तर हा विषय अतिशय सोपा ठरतो. गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जलद गतीने कशा प्रकारे करता येतात यांची उदाहरणे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कॅलेंडरमधील गमती जमती रंजक पद्धतीने सांगितल्या गेल्या. भौमितिक आकृत्यांची मोजणी सहजपणे व अचूक कशी करता येते ते सांगण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवस
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक २१/०६/२०१८ वार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज करवंद नाका शिरपूर येथील मैदानावर इयत्ता तिसरी व इयत्ता  चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता नेण्यात आले. येथील प्रशस्त मैदानावर शिरपूर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी योगासन वर्गासाठी हजर होते. शिरपूर शहरातील योग विद्या धामचे योग गुरू तसेच विविध शाखांमधील योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हा योगासन वर्ग आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी योगासन करताना मंत्रमुग्ध होऊन गेले होते. योगासन वर्गाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून नियमितपणे योगा करण्याची शपथ वदवून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आर. सी. पटेल संकुलातील सर्व शाळांना एकत्रितपणे योगासन साजरे करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Wednesday, 11 July 2018

पालक शिक्षक सहविचारसभा

पालक शिक्षक सहविचारसभा 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक १०/०७/२०१८ वार मंगळवार व दिनांक ११/०७/२०१८ वार बुधवार रोजी अनुक्रमे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी वर्गांच्या पालक सहविचार सभा घेण्यात आल्या. या सहविचार सभेत खालील बाबींचा समावेश होता.


१. शालेय शिस्त. 

२. गणवेश बाबत सजक असणे.

३. विद्यार्थ्याच्या अभ्यासाबाबत जागरूक असणे. 

४. विद्यार्थ्याची डायरी नियमितपणे पाहणे. 

५. विद्यार्थ्याच्या डायरीत अभ्यास केल्यावरच सही करणे. 

६. विद्यार्थ्यास शाळेत नियमित पाठवणे. 

७. दर रविवारी online Test विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे. 

८. वर्गशिक्षकाशी शाळेत भेटण्याची वेळ शनिवारी सकाळी ९:३० ते १०:३०

९. Whats app ग्रुपच्या माध्यमातून सतत संपर्कात राहणे. 

Monday, 9 July 2018

कार्यानुभव

कार्यानुभव प्रात्यक्षिक 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक ०९/०७/२०१८ वार सोमवार रोजी कार्यानुभव या विषयाअंतर्गत कागदाकाम प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. घोटीव कागदापासून तसेच क्राफ्ट पेपर पासून कागदाच्या विविध वस्तू कशा तयार कराव्यात या बाबत शाळेतील विद्यार्थ्यांना जोधपूर राजस्थान येथून आलेले श्री. दयालचंद्र राव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून कागदापासून विविध वस्तू तयार करून घेतल्या. श्री. दयालचंद्र राव यांनी कागदापासून गुलाबपुष्प तयार करून शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर यांचे स्वागत केले. व शाळेस कार्यानुभव विषयाचे पुस्तक सदिच्छा भेट म्हणून दिले. 


Saturday, 16 June 2018

शाळेची 'सुरेल' सुरुवात

सुरेल सुरुवात 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत दिनांक १५/०६/२०१८ वार शुक्रवार रोजी शाळा शुभारंभ 
नवागतांचे स्वागत व पुस्तक दिन 

म्हणून साजरा करण्यात आला. शाळेत आलेल्या नावागतांचे शालेय प्रांगणात पारंपारिक पद्धतीने शहनाईच्या मंगल स्वरांनी कुंकुमतिलक लावून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. शाळेतील  १५/०६/२०१८ रोजी वाढदिवस असणा-या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्या देण्यात आल्या. तसेच शाळेतील शिक्षकांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने शाळेच्या ग्रंथालयास पुस्तक भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना प्रथम दिवसी शासनाकडून मिळणा-या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गजेन्द्र जाधव सर व आभार प्रदर्शन श्री. गोपाल न्हावी सर यांनी मानले

Saturday, 10 March 2018

वर्कशीट कार्यशाळा

 शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षकांसाठी संस्थेने वर्कशीट कार्यशाळेचे दिनांक २४/०२/२०१८ वार शनिवार रोजी आयोजन केला गेला. कार्यशाळेप्रसंगी  प्राचार्य ज्युलि थॉमस,मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, रवींद्र खोंडे,आर.टी. भोई, बी.आर.महाजन,के.टी.जाधव, बी.बी.सोनवणे, पी.डी.कुलकर्णी, बी.एम.माळी,मनोज पाटील, गोपाल पाटील, सी.डी.पाटील, स्मिता पंचभाई, एलिजाबेथ जानवे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक सी.डी.पाटील यांनी केले. गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, बी.एम.माळी यांनी विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य ज्युलि थॉमस यांनी वर्कशीट बाबत विशेष मार्गदर्शन केले.यात वर्कशीट म्हणजे काय? प्राथमिक स्तरावर त्याची गरज काय याबाबत सविस्तर माहिती शिक्षकांना दिली. विविध विषयांचे वर्कशीट कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातील वर्कशीट अर्थातच स्वतंत्र विषयवार स्वाध्याय पुस्तक असण्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी शिक्षकांना महत्त्व समजावून सांगितले. शिक्षकांनी स्व निर्मितीवर भर द्यावा असही डॉ.शर्मा यांनी मनोगतात व्यक्त केले. कार्यशाळेत प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे ऐंशी शिक्षकांचा सहभाग होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राजपूत यांनी केले. आभार जगदीश धनगर यांनी मानले.





Thursday, 22 February 2018

शिव जयंती

शिव जयंती 


आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपुर या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग कथन केले. इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला. 

Monday, 19 February 2018

वार्षिक स्नेहसंमेलन

"वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न".

शिरपूर येथील आर.सी.पटेल  प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,विश्वस्त गोपाल भंडारी, संस्थेचे सी.ई. ओ.डॉ. उमेश शर्मा,महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेविका संगीताताई देवरे,आशाताई बागुल, वित्त अधिकारी नाटूसिंग गिरासे,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,ऍड. ज्ञानेश्वर थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, साधन व्यक्ती मनोहर वाघ ,उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल सोनवणे,डॉ.दीपक बागुल, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, मनोज पाटील, गोपाल पाटील, रवींद्र खोंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात वीस विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा सादर करून उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.यात नवनवीन विषयांचे  सादरीकरण तसेच उद्बोधन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात बालवाडी ते चौथी वर्गातील एकवीस विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमात पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक वर्षातील यशोगाथा पी.पी.टी.च्या माध्यमातून मांडली,तसेच पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात थीम बेस कार्यक्रमाचे सादरीकरण केले.यात ओल्ड इज गोल्ड,बॉलिवूड सॉंग,महाराष्ट्रातील सण व उत्सव,महाराष्ट्राची संस्कृती आदी विषयांवर वैविध्यपूर्ण सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी,गजेंद्र जाधव ,जगदीश धनगर यांनी केले.
आभार जगदीश सोलंकी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी,रेखा माळी,मोहिनी सोनवणे,स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे,रमेश शिरसाठ, सुभाष भिल, वैशाली बारी,संगीता चव्हाण, अर्चना जोशी, शुभांगी बाविस्कर,योगेश बागुल, अनिल माळी परिश्रम घेतले.

वेशभूषा व वार्षिक पारितोषिक वितरण

"वेशभूषा व वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न".
शिरपूर येथील आर.सी.पटेल  प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळयाचे आयोजन  करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, नगरसेविका आशाताई बागुल, माजी नगरसेवक दिलीप बोरसे,योग विद्याधाम संचालक डॉ.श्रीकांत वाडीले,ऍंड. ललेश चौधरी, ऍड. ज्ञानेश्वर थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, साधन व्यक्ती मनोहर वाघ,सचिन जडिये, नितीन पाटील,उत्तम महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल सोनवणे, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी, मनोज पाटील, गोपाल पाटील, रवींद्र खोंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
वेशभूषा कार्यक्रमात शाळेतील ६१ विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या यात बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक काढण्यात आला. सदर प्रथम येणाऱ्या विद्यार्थास सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. वेशभूषा परीक्षण विवेकानंद ठाकरे व ज्वाला मोरे यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते चौथी वर्गातील विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडा री यांनी बक्षीस योजनेसाठी भरीव आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मिशन स्वच्छ विद्यालय अंतर्गत शिरपूर वरवाडे नगरपालिके तर्फे स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले.तसेच शिक्षकांनी स्वखर्चाने डिजीटल वर्ग केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र माळी,गजेंद्र जाधव यांनी केले.आभार अविनाश राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी, जगदीश धनगर, संदीप चौधरी, गोपाल न्हावी,सुभाष भिल, प्रकाश ईशी,योगेश बागुल, मोहिनी सोनवणे, स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे, बबिता काटोले, रेखा माळी,श्वेता चौधरी यांनी परिश्रम घेतले.



"बाल आंनद मेळावा संपन्न."

"बाल आंनद मेळावा संपन्न."

शिरपूर येथील आर.सी.पटेल  प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आला. या प्रसंगी बाल आंनद मेळावा घेण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी महिला बाल कल्याण सभापती रंजनाताई सोनवणे,नगरसेविका संगीताताई देवरे,आशाताई बागुल,मुख्यकार्यकारी अधीकारी डॉ. उमेश शर्मा,लायनेस गृप सदस्या रत्नप्रभा सोनार, नगरसेवक हर्षल गिरासे,साधन व्यक्ती मनोहर वाघ,अतुल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे,प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंके, महेंद्र परदेशी बी.एम.माळी,मनोज पाटील,गोपाल पाटील,बी.बी.सोनवणे,रवींद्र खोंडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
बाल आंनद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी दीडशे विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावलेले होते.
विद्यार्थ्यांना बालवयात आर्थिक व्यवहाराची समज यावी तसेच व्यवहारी ज्ञान व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळा दरवर्षी असे उपक्रम राबवित असते. सदर उपक्रमाला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य व स्वच्छता गीत सादर करून पालकांना स्वच्छता संदेश देण्यात आला. ओला कचरा,सुका कचरा याबाबत जनजागृती करण्यात आली.

सूत्रसंचालन जगदीश सोलंकी यांनी केले.आभार प्रकाश ईशी यांनी मानले. उपशिक्षका रेखा माळी,मोहिनी सोनवणे, बबिता काटोले,स्मिता साळुंखे, वंदना सोनवणे, शुभांगी बाविस्कर, संगीता चव्हाण, अर्चना जोशी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महेंद्र माळी,गजेंद्र जाधव,संदीप चौधरी, गोपाल न्हावी,अविनाश राजपूत, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर, योगेश बागुल यांचे सहकार्य लाभले.